|
संजय गांधी निरधार अनुदान
योजनेअंतर्गत
65
वर्षाखालील निराधार महिला, अनथ मुले, अपंगतील सर्व प्रवर्ग, घटस्पोट
प्रक्रियेतील महिला यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेमध्ये
21,000/-
ऊत्पन्न मर्यादा आहे. या योजनेखाली पात्र होणार्या कुटुंबात एक लाभार्थी
असल्यास रू.750/-
इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.
पात्रतेची अर्हता -
1)अपंगातील
अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधीर, मतिमंद इ. स्त्री-पुरूष.
2)क्षयरोग,
पक्षाघात, प्रमस्तिष्कघात कर्करोग, एड्स, कृष्टरोग इ. स्त्री-पुरूष.
3)शेतमजूर
महिला.
4)अनाथ
महिला.
5)निराधार
विधवा घटस्पोट प्रक्रियेतील व घटस्पोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या,
अत्याचारीत व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला.
6)
18
वर्षाखालील अनाथ मुले.
पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे -
1)विहीत
नमुन्यात अर्ज.
2)वयाचा
दाखला.
3)तहसिलदार/उप
विभागीय अधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला.
4)ग्रामसेवक/तलाठी/मंडल
अधिकारी/नायब तहसिलदार/ तहसिलदार यांनी दिलेला रहिवाशी दाखला.
5)शल्यचिकित्सक
यांचे अपंगाचे प्रमाणपत्र.
6)जिल्हा
शल्यचिकित्सालक यांचा असमर्थतेचा/रोगाचा दाखला.
7)
कोणत्याही सरकारी/निमसरकारी/निवासगृहाचा आंतरवासी नसल्याबाबतचा दाखला.
8)अनाथ
असल्याचा दाखला.
9)रेशन
कार्डची झेरॉक्स प्रत. |