Click Here to
view the Blog
|
वरील योजनेखाली घेण्यात आलेल्या निर्णयानुसार सुधारीत अर्थसहाय्य, निवृत्तीवेतनाचे दर पात्रतेचे निकष व अर्हता व प्रमाणपत्रांची अधिकारीता सोबतच्या परिशिष्ट-1 नुसार राहील. योजनेखाली पात्र होण्यासाठीच्या अतिरीक्त अटी परिशिष्ट-2 नुसार राहतील. अर्ज करण्याची पध्दत, संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीचे गठण, कार्यपध्दती, समितीच्या बैठका परिशिष्ट प्रमाणे राहील. अर्थसहाय्य व वितरणाची पध्दत व लाभार्थ्याची पडताळणी परिशिष्ट-4 प्रमाणे राहील अर्जाचा नमुना, प्रमाणपत्राचे नमुने, मासिक/त्रैमासिक अहवालाबाबतचे नमुने परिसशिष्ट-5 प्रमाणे राहतील. 2. सदर शासन निर्णय दिनांक 1 ऑगष्ट2008 पासुन अंमलात येईल. 3. या योजनांखालील विद्यमान व वाढीव लाभार्थ्यांची संख्या, देय अनुदानाचे व खर्चाचे मासिक अहवाल परिशिष्ट-5 मधील नमुना बारा, तेरा, चौदा, पंधरा-अ मध्ये तहसिलदार यांनी जिल्हाधिकार्यांना सादर करावेत आणि परिशिष्ट-5 मधील नमुना बारा, तेरा, चौदा, पंधरा-ब व पंधरा-क जिल्हाधिकारी/विभागीय आयुक्त यांनी त्रैमासिक/वार्षीक अहवाल शासनाला सादर करण्याची दक्षता घ्यावी. तसेच सध्या लाभ मिळणार्या लाभार्थ्यांना अनुदान नियमितपणे देण्यात यावे. मात्र नवीन निवड केलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान शासनाकडुन अतिरिक्त निधी मिळाल्यानंतरच देण्यात यावे. 4. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारीक संदर्भ क्रमांक 322/08/व्यय-14, दिनांक 21-08-2008 अन्वये निर्गमित करण्यात येत आहे. 5.सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर करण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक -20080930172852001 असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
|