Home > About Kolhapur > Introduction >  Co-Operative Sector


 

सहकार विभाग

 
                              कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ

महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा हा सहकार चळवळींमधील अग्रेसर जिल्हा आहे. सहकारी चळवळींमुळे जिल्ह्यामध्ये अमुलाग्र बदल घडून येतो. जिल्ह्यामध्ये 9624 सहकारी संस्था आहेत. ह्या संस्थांमध्ये 31.21 लाख व्यक्ती आहेत. ह्या संस्थांमध्ये 364.26 करोड शेअर्स आहेत.त्याच्यातील 25.95 करोड शेअर्स रक्कम सरकारची आहे आणि 338.32 करोड रक्कम ही त्यांची स्वत:ची आहे. ह्या संस्थांची 2030.57 करोड रक्कमेच्या ठेवी व 3383.61 करोड रक्कमेची वाटलेली कर्जे आहेत.

जवळपास बर्‍याचशा सहकारी संस्था साखर कारखाना, दुध संस्था, बॅंका, बाजार संस्था व सुत गिरण्या यांच्या आहेत ज्या सहकारी क्षेत्रामध्ये महत्त्वाची भुमिका बजावतात.

सहकारी साखर कारखाने

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 सहकारी साखर कारखाने आहेत.ह्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये 2.84 लाख सभासद आहेत. ह्या साखर कारखान्यांचे 61.84 करोड रुपये शेअर्स आणि 56.86 करोड रूपये खेळते भांडवल आहे. ह्या कारखान्यांची एकूण ऊत्पादन क्षमता 62.15 लाख मे. टन आहे आणि एकुण साखर निर्मीती 7.56 लाख मे.टन आहे.

सहकारी दुध संस्था

Buffalo MilkingMilk Collection

Milk Packingकोल्हापूर जिल्ह्यामध्ये गोकुळ दुध संघ गोकुळशिरगाव, वारणा दुध संघ वारणानगर व मयुर दुध संघ कोल्हपूर हे तीन सहकारीतत्वावरील संघ आहेत. ह्यांच्यामध्ये एकुण 2755 दुध संस्था आहेत.ह्या संस्थांमध्ये 3.41 लाख सभासद आहेत. ह्या संघांमध्ये दुध खरेदीची रक्कम 323.32 करोड रूपये आहे व विक्रीची रक्कम 600.54 करोड रूपये आहे.

 

 

   

read more..