Click Here to
view the Blog
कोल्हापूर जिल्ह्याचे भौगोलिक रित्या पूर्व, मध्य व दक्षिण अशा तीन भागात विभागले आहे. पूर्व व मध्य भागात ‘लावा’ पासून बनलेली काळी जमीन आहे आणि काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन आहे. पूर्वेकडील जास्त भाग टेकड्यांनी व लाल मातीने व्यापला आहे. पूर्वेकडील जास्तीतजास्त भाग जंगलांनी व्यापला आहे.
नद्या
पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा, भोगावती, हिरण्यकशी आणि घटप्रभा ह्या मुख्य नद्या आहेत ज्या पूर्व – पश्चिम घाटातून वाहतात.कुंभी, कासारी, तुळसी व भोगावती ह्या नद्यांच्या संगमातुन पंचगंगा नदी तयार झाली आहे. जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून पूर्वेकडे कृष्णा नदी वाहते तसेच तिल्लरी नदी पश्चिम सीमेवरुन पश्चिमेकडे वाहते.
|