Home > About Kolhapur > Introduction >Vegetaion


  • वनस्पती

 

जंगल

 

जिल्ह्यातील एकुण जंगल क्षेत्र 1672 स्क्वे.मी. आहे त्यातील 563 स्क्वे.मी. क्षेत्र जंगलासाठी राखीव आहे व 417 स्क्वे.मी. क्षेत्र संरक्षित जंगलाचा भाग आहे. जिल्ह्यातील भौगोलिक क्षेत्रापैकी 22 % क्षेत्र जंगलांनी व्यापलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जंगलाचे तीन प्रकार आहेत.

      1) ऊष्ण व समशीतोष्ण कटिबंध यांच्यामधील सदाहरीत वृक्षांचा भाग.

      2) दमट वातावरणातील पानेझडीत व कमी सदाहरीत वृक्ष.

      3) कोरड्या वातावरणातील पानेझडीत जंगल.

 

ऊष्ण व समशीतोष्ण कटिबंधीत जंगलांमध्ये जांबुळ, हिरडा, अंजन, सुरंगी, फणस ई. महत्त्वाची झाडे आढळतात. कारवी, ब्राचीन व ईतर वनस्पतींनी हे मैदान व्यापले आहे. आपल्याला मध्यम सदाहरीत व दमट वातावरणामधील जंगलामध्ये आंबा, नाना, सिसम, आसाना, कुंभी, भवा, किंजल, ऐन, किन्नई, अंबर, बिबा, आणि ईतर वनस्पती आढळतात. कोरड्या वातावरणामधील जंगलांमध्ये वरील वनस्पतींमधील काही वनस्पती आढळतात. ह्या जंगलांचे राखीव व संरक्षित जंगलांमध्ये वर्गीकरण केलेले आहे, आणि ह्या प्रात्त्यक्षिकांची प्रतिकृती कुमारी मध्ये करण्यात आली आहे. आगीचे लाकूड व गवत ह्या दोन मिळकत करून देणार्‍या वनस्पती येथे आढळतात. काजु, शिकाकाई, सोनेरी धागा, आनि, वॅक्स ई. जंगलातील ऊत्पादन आहेत.